Posts

Showing posts from April, 2025

पर्यटनाचा पर्यावरणावर होणारा परिणाम

पर्यटनाचा पर्यावरणावर होणारा परिणाम पर्यटन हा एक प्रमुख जागतिक उद्योग आहे जो बऱ्याच देशांच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देतो. यामुळे रोजगार , पायाभूत सुविधांचा विकास आणि सांस्कृतिक देवाणघेवाण असे असंख्य फायदे होत असले , तरी पर्यटनामुळे पर्यावरणापुढेही गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. पर्यटनाचे पर्यावरणीय परिणाम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही असू शकतात आणि त्यांची तीव्रता पर्यटन क्रियाकलापांच्या प्रकार आणि प्रमाणात अवलंबून बदलते.  पर्यटनाचा पर्यावरणावर होणारा परिणाम नकारात्मक १ नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास    2 प्रदूषण 3 जैवविविधतेचा ऱ्हास ४ हवामान बदल पर्यटनाचा पर्यावरणावर होणारा परिणाम नकारात्मक असून तो खालीलप्रमाणे आहे. १. नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास पर्यटनामुळे पाणी , अन्न (कृषी उत्पादन) , गंतव्य स्थळी पर्यटकांच्या आगमनामुळे पाणी आणि अन्न (कृषी उत्पादन) , जमीन अशा नैसर्गिक साधनसंपत्तीची मागणी वाढते , पाणी , अन्न आणि उपलब्ध जमिनीची मागणी वाढल्यामुळे परिसरातील उपलब्ध नैसर्गिक संसाधनांवर ताण पडतो किंवा भार पडतो. साहजिकच या भागातील नै...